Join us

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक १६० किमी वेगाने प्रवासाची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 5:50 AM

रेल्वे बोर्डाचा यू टर्न; सेमी हायस्पीड तंत्रज्ञानावरील मेमू तयार नसल्याने चाचणी रखडली

मुंबई : दोन शहरांमधील अंतर कमी वेळेत पार करण्यासाठी ‘वंदे भारत’च्या धर्तीवर मेमू तयार करणार असल्याचे वक्तव्य रेल्वे मंडळाचे सदस्य (मेंबर आॅफ रोलींग स्टॉक) राजेश अग्रवाल यांनी एका महिन्यांपूर्वी केले होते. मात्र एका महिन्यातच त्यांनी या वक्तव्यावरून यू टर्न घेतला आहे. सेमी हायस्पीड तंत्रज्ञानावरील मेमू तयार नसल्याने मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक मार्गावरील चाचणी रखडली आहे, असे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात अग्रवाल म्हणाले.

नरिमन पॉइंट येथे मंगळवारी ६४ वा वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभ २०१९ पार पडला. चांगली कामगिरी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अग्रवाल बोलत होते. अग्रवाल म्हणाले, मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक मार्गावरील रेल्वे रुळांची क्षमता ताशी १६० किमी या वेगाने करणे, रेल्वे फाटक बंद करणे, रेल्वे प्रवासातील अपघातावर नियंत्रण राखणे, तिन्ही मार्गावरील रुळालगत भिंत उभारणे अशा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे मंडळाने तीन टप्पे आखले आहेत. पहिल्या टप्प्यात वेग वाढवून लोकल फेºया वाढविण्याचे नियोजन केले आहे. दुसºया टप्प्यात मेमू चालविण्याचे उद्दिष्ट आणि तिसºया टप्प्यात शहरांतर्गत इंटरसिटी एक्स्प्रेस चालविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.कर्मचाºयांचा सन्मानया सोहळ््यात १३३ वैयक्तिक पुरस्कार प्राप्त कर्मचारी आणि अधिकाºयांना पदक, धनादेश व प्रमाणपत्रे व चार विभागीय स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी सर्व झोन व उत्पादन युनिटचे महाव्यवस्थापक, इतर अधिकारी उपस्थित होते. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून, महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांना वाचविणाºयांचे आभार मानले.लोकल फेºया वाढणारउपनगरी रेल्वे १०० ते १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार असल्याने फेºया वाढणार असे राजेश अग्रवाल यांनी सांगितले.सप्टेंबरमध्ये धावणार पहिली खासगी रेल्वेसप्टेंबरमध्ये दिल्ली ते लखनऊ या दरम्यान पहिली खासगी रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे बोर्डचे अध्यक्ष (सीआरबी) व्ही. के. यादव यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईलोकलरेल्वेपुणे