मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांचे महिन्यातील वेतन ७ तारखेला झालेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री ॲड. अनिल परब आणि परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांची बैठक झाली होती. बैठकीत ६०० कोटी एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही रक्कम एसटीच्या खात्यात वर्ग झाली नाही. गेल्या काही दिवसांनी एसटीचे अधिकारी मंत्रालयात फेऱ्या मारत आहेत.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला केले जाते. परंतु जून महिन्याची १५ तारीख उलटून गेली आहे, गणेशोत्सव तोंडावर आला आहे, मात्र जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे.
कोरोना विषाणूमुळे २३ मार्चपासून एसटीची चाके थांबली. त्यामुळे महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडले आहेत. एसटीला दररोज २२ कोटींचे उत्पन्न होते, त्यात मोठी घट झाली होती. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २७० कोटींची आवश्यकता असते.
उत्पन्न सहा कोटीवर
गेल्या काही महिन्यात एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. एसटीचे उत्पन्न दोन कोटींवर आले होते. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे एसटीची वाहतूक वाढली आहे. सोमवारी ६ कोटी १८ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
जूनचा दुसरा आठवडा संपला तरी मे महिन्याचा पगार मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
एक एसटी कर्मचारी
६०० कोटी निधी दिल्याबद्दल शासनाला धन्यवाद! पण तरीही एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे. त्यात एक दिवस जरी वेतन उशिरा मिळाले तरी कर्मचाऱ्यांच्या संसाराचे बजेट कोलमडून जाते. त्यामुळे शासनाने दिलेल्या निधीची रक्कम तत्काळ एसटीकडे वर्ग करावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस,महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस