तलावांमध्ये सात टक्के जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:09 AM2021-09-08T04:09:02+5:302021-09-08T04:09:02+5:30

मुंबई : मागील काही दिवस पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता ...

Waiting for the reservoirs to increase by seven per cent | तलावांमध्ये सात टक्के जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा

तलावांमध्ये सात टक्के जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा

Next

मुंबई : मागील काही दिवस पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता १३ लाख ४२ हजार ४८५ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आता सात टक्के जलसाठा वाढण्याची प्रतीक्षा आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो, तर वर्षभर मुंबईत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे चार तलाव भरून वाहू लागले. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न मिटण्यासाठी आता एक लाख चार हजार ४७८ दशलक्ष लिटर जलसाठा कमी पडत आहे.

अन्यथा पाणी कपातीची शक्यता

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस झाल्याने २१ ऑगस्टला पाणी कपात १० टक्के करण्यात आली. २०१८ मध्ये पाणीसाठ्यात नऊ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित आठ टक्के जलसाठा जमा न झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

७ सप्टेंबर २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ११८३०६ १६१.८३

तानसा १२८.६३ ११८.८७ १४४७११ १२८.६१

विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.....८०.२५

तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२०

अपर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ १८२९४१..६०२.१४

भातसा १४२.०७ १०४.९० ६७५८८३.. १४०.५७

मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८४८९९ ..२८३.४६

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ - १३४२४८५....९२.७५

२०२० - १४१७९३१...९७.९७

२०१९- १४१५९८७...९७.८३

Web Title: Waiting for the reservoirs to increase by seven per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.