पालिका कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत, बायोमेट्रिक यंत्रातील दोषाचा बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:46 AM2019-05-11T02:46:38+5:302019-05-11T02:49:16+5:30
पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. यामुळे हजेरीची नोंदच न झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.
मुंबई : पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. यामुळे हजेरीची नोंदच न झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या संख्येने गेलेल्या कर्मचाºयांना याचा मोठा फटका बसला आहे. याबाबत रोष वाढत असल्याने येत्या सोमवारपर्यंत कर्मचाºयांच्या खात्यात वेतन जमा करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
महापालिकेत वर्षभरापूर्वीच बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जेवढ्या दिवसांच्या हजेरीची नोंद या यंत्रावर होईल, तेवढ्याच दिवसांचे वेतन कर्मचाºयांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जमा होते. मात्र या यंत्राला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक तक्रारी येऊ लागल्या. बºयाच वेळा कर्मचाºयांना गैरहजर दाखवणे, शिफ्टमधील कर्मचाºयांची योग्य नोंद न होणे, कर्मचाºयांनी घेतलेल्या रजांची व ड्युटी बदलाची प्रणालीत नोंद न होणे असे प्रकार होऊ लागले, अशी तक्रार कर्मचारी संघटना करीत आहेत.
मार्च महिन्यातही बायोमेट्रिक यंत्रामधील तांत्रिक बिघाडाचा फटका काही कर्मचाºयांना बसला होता. मात्र या महिन्यात हजारो कर्मचाºयांचे वेतन झालेले नाही. काहींना पगाराची शून्य स्लीप आली असून काहींच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी ११ हजार पालिका कर्मचारी गेले आहेत. त्यांच्या हजेरीची नोंद न झाल्याने त्यांचा पगार झालेला नाही. यामुळे कामगारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कर्मचाºयांचे वेतन १३ मेपर्यंत देण्यात यावे, असा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आला
आहे.