सुरक्षारक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: June 10, 2015 03:00 AM2015-06-10T03:00:58+5:302015-06-10T03:00:58+5:30

सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्या पगारवाढीसाठी क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघटनेने मंगळवारी राज्यमंत्री विजय देशमुख यांची भेट घेतली.

Waiting for the security guard to rise | सुरक्षारक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत

सुरक्षारक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत

Next

मुंबई : सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांच्या पगारवाढीसाठी क्रांतिकारी सुरक्षारक्षक संघटनेने मंगळवारी राज्यमंत्री विजय देशमुख यांची भेट घेतली. त्या वेळी झालेल्या बैठकीत कामगार उपायुक्त यांनी सुरक्षारक्षकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. या संदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत देशमुख यांनी सुरक्षारक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी दर दोन वर्षांनी सुरक्षारक्षकांची होणारी वेतनवाढ सहा महिन्यांपासून रखडल्याचे संघटनेने सांगितले. सुरक्षारक्षकांना महागाईनुसार किमान २२ हजार रुपये देण्याची मागणीही संघटनेने या वेळी केली.
याप्रकरणी प्रस्ताव मिळताच कामगार विभागाचे कॅबिनेट मंत्री प्रकाश महेता यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे. तत्काळ प्रस्ताव मंजूर करून कॅबिनेट मंजुरी घेऊन घोषणा करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष पगारवाढ कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत सुरक्षारक्षक आहेत.
-----------
खाजगी रक्षकांना दिलासा
मंडळाकडे नोंदणी नसलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांचेही सर्वेक्षण करण्याचे आदेश देशमुखांनी दिले. त्यामुळे कंत्राटदाराकडून पिळवणूक होणाऱ्या सुरक्षारक्षकांना दिलासा मिळणार आहे. खाजगी सुरक्षारक्षकांना सुटी, सेवाशर्ती आणि किमान वेतन न देणाऱ्या एजन्सींवरही कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Waiting for the security guard to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.