हिंदमाता पूरमुक्त होण्यास आणखी दोन वर्षे प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:46 AM2019-03-05T00:46:14+5:302019-03-05T00:46:19+5:30

पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या हिंदमाता परिसराची समस्या आजही कायम आहे.

 Waiting for two more years to get rid of Hindmata | हिंदमाता पूरमुक्त होण्यास आणखी दोन वर्षे प्रतीक्षा

हिंदमाता पूरमुक्त होण्यास आणखी दोन वर्षे प्रतीक्षा

Next

मुंबई : पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या हिंदमाता परिसराची समस्या आजही कायम आहे. हा परिसर पूरमुक्त करण्याचे महापालिकेचे अनेक प्रयत्न फेल गेले आहेत. पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यास दीर्घकालीन उपाययोजनांचा भाग म्हणून २.५ किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र हे काम अपूर्ण असल्याने हिंदमाता परिसर पुरमुक्त होण्यास आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पर्जन्यजल वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता अनेक ठिकाणी ५० मि.मी. एवढी करण्यात आली आहे. मात्र हिंदमाता परिसर हा जवळपासच्या इतर परिसरांपेक्षा खोल असल्याने या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास तुलनेने अधिक वेळ लागतो. त्यामुळे या परिसराशी संबंधित तब्बल दोन हजार ५०० मीटर म्हणजेच २.५ किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. या कामांमध्ये दोन जुन्या पर्जन्यजल वाहिन्यांच्या पुनर्बांधणीसह पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणाऱ्या एका अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनीचाही समावेश आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामामुळे हिंदमाता परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होण्यास मदत होईल, असा दावा पर्जन्यजल वाहिन्या खात्याद्वारे करण्यात आला आहे. तोपर्यंत मात्र हिंदमाता परिसरात तुंबणाºया पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागणार आहे.
>असे सुरू आहे काम...
हिंदमाता परिसरातील डॉ. आंबेडकर मार्गालगत बी. जे. देवरुखकर मार्ग ते मडकेबुवा चौक यादरम्यान ७५० मीटर लांब आणि ९०० मिमी रुंद व १,२०० मिमी उंची असणाºया दोन कमानी पद्धतीच्या ब्रिटिशकालीन पर्जन्यजल वाहिन्या आहेत. ३,००० मिमी रुंदी व १,२०० मिमी उंचीची (३ मीटर ७ १.२ मीटर) ‘बॉक्स ड्रेन’ प्रकारची पर्जन्यजलवाहिनी या ठिकाणी बांधण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ४७ टक्के काम झाले असून, फेब्रुवारी २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल.लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंते चौक यादरम्यान जुन्या कमानी पद्धतीची ३,००० मिमी रुंदी व २,७०० मिमी उंची असणाºया पर्जन्यजल वाहिनीलगत १,८०० मिमी व्यासाची अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बांधण्यात येत आहे. हे काम ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने केले जात आहे. ९५० मीटर लांबी असणाºया या वाहिनीचे सुमारे ६५ टक्के काम झाले असून मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल.
महर्षी दयानंद महाविद्यालय जंक्शन ते साईबाबा मार्ग जंक्शन यादरम्यान ८०० मीटर लांबीची व १,००० मिमी व्यासाच्या भूमिगत पर्जन्यजल वाहिनीचे पुनर्बांधकाम सुरुवातीला १,२०० मिमी व्यास, नंतर १,४०० मिमी व्यास व त्यानंतर १,८०० मिमी व्यास याप्रमाणे उताराकडे वाढत्या आकारात बांधण्यात येणार आहे. हे काम नुकतेच सुरू झाले आहे.

Web Title:  Waiting for two more years to get rid of Hindmata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.