मलजल पुनर्प्रक्रियेतून मिळणाऱ्या पाण्याची मुंबईकरांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 07:00 AM2018-12-23T07:00:25+5:302018-12-23T07:00:35+5:30
अपु-या जलसाठ्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. याने मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मलजल प्रकल्पाच्या प्रक्रियेतून शुद्ध होणारे दोन हजार दशलक्ष लीटर पाणी अद्याप मुंबईकरांच्या घागरीत पडलेले नाही.
मुंबई : अपुºया जलसाठ्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. याने मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मलजल प्रकल्पाच्या प्रक्रियेतून शुद्ध होणारे दोन हजार दशलक्ष लीटर पाणी अद्याप मुंबईकरांच्या घागरीत पडलेले नाही. मात्र,
या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी होणार आहे.
मुंबईत दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर लाखो लीटर पिण्याचे पाणी सांडपाण्याच्यामार्गे वाहून जाते. या पाण्यावर प्रक्रिया केल्यास त्या पाण्याचा वापर बागकाम, गाडी धुणे अशा कामांसाठी करता येईल. परिणामी, पिण्याच्या पाण्याची बचत होईल या उद्देशाने आठ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार होते.
या प्रकल्पाला अजूनही अपेक्षित गती मिळालेली नाही. पिण्याचे
पाणी आजही अन्य कामांसाठी वापरले जात आहे. मुंबईकर सध्या पाणीटंचाईचा सामना करीत असल्याने या कामाचा आढावा पालिका
आयुक्त अजय मेहता यांनी शुक्रवारी घेतला. त्यानुसार या पाण्याचे
योग्य नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाºयांना दिले
आहेत.
...यासाठी होणार वापर
मुंबईत आठ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मलजल केंद्रांद्वारे दररोज सुमारे दोन हजार दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे, नौदल, बीपीसीएल, एचपीसीएल, विमानतळ प्राधिकरण, गोदी इत्यादी आस्थापना महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात पाणी खरेदी करतात.
या आस्थापनांना पुरविले जाणारे पाणी हे पिण्याचे पाणी असते. याच पाण्याचा रेल्वेचे डबे धुण्यासारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठीही वापर होतो.
यासारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी मलजल प्रक्रिया केंद्रांमधून उपलब्ध होणाºया पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर व्हावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.