मुंबई धुरक्याच्या विळख्यात, वातावरणात मोठा बदल, विचित्र हवामानामुळे मुंबईकर झाले त्रस्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 05:27 AM2017-09-12T05:27:51+5:302017-09-12T05:27:56+5:30

मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर, वातावरणात मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे झाली आहेत. विशेषत: पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यात पुन्हा सक्रिय झालेला पाऊस व अचानक वाढलेला उष्मा अशा संमिश्र वातावरणात, पूर्वेकडून मुंबईकडे वाहणारे वारे, येथील वातावरणात पसरलेल्या धुळीकणांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

In the wake of the Mumbai blasts, due to the huge change in the environment, the strange weather has caused Mumbaiites to suffer | मुंबई धुरक्याच्या विळख्यात, वातावरणात मोठा बदल, विचित्र हवामानामुळे मुंबईकर झाले त्रस्त  

मुंबई धुरक्याच्या विळख्यात, वातावरणात मोठा बदल, विचित्र हवामानामुळे मुंबईकर झाले त्रस्त  

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर, वातावरणात मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतरे झाली आहेत. विशेषत: पावसाने घेतलेली विश्रांती आणि त्यात पुन्हा सक्रिय झालेला पाऊस व अचानक वाढलेला उष्मा अशा संमिश्र वातावरणात, पूर्वेकडून मुंबईकडे वाहणारे वारे, येथील वातावरणात पसरलेल्या धुळीकणांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. हवेतील घसरलेल्या गुणवत्तेमुळे मुंबई धुरक्याच्या विळख्यात सापडली आहे. सोमवारी मुंबईच्या वातावरणात दिवसभर पसरलेल्या धुळीकणांमुळे मुंबईकरांना वातावरणाचा ‘विचित्र’ अनुभव आला. वातावरणातील या स्थितीमुळे उंच इमारती धुरक्यात हरवल्याचे चित्र होते. विशेषत: सायंकाळसह रात्री उशिरा मुंबईच्या वातावरणात वाहणा-या गरम वा-यांमुळे मुंबईकर चांगलेच त्रस्त झाले होते.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुंबईमधील हवेची गुणवत्ता सोमवारी प्रचंड घसरली. मुंबईच्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुळीकण मिसळले. परिणामी, मुंबई शहरासह उपनगरावर धुळीकणांची चादर पसरली.

आर्द्रतेमुळे उकाड्यातही प्रचंड वाढ
वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुळीकण पसरल्याने, वाहन चालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते. मुंबई शहरात माझगाव, कुलाबा, पश्चिम उपनगरात बोरीवली, मालाड, अंधेरी, पूर्व उपनगरात भांडुप, बीकेसी, चेंबूर आणि नवी मुंबई येथे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. मुंबईत पूर्वेकडून वारे वाहत असल्याने, कमाल तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, शिवाय आर्द्रतेमधील वाढीने उकाड्यातही प्रचंड वाढ झाली.

प्रदूषणामुळे वाढली आर्द्रता
सोमवारी मुंबईच्या हवेत ९९ टक्के आर्द्रता होती. दररोज ही आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांच्या आसपास असते. धूर आणि प्रदूषणामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली. परिणामी, धुके आणि धूर मिळून धुरके तयार झाले. वाढते तापमान याचे प्रमुख कारण असून, किमान आता तरी औद्योगिकीकरणाला ‘तिलांजली’ देण्याची गरज आहे.
- गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

हवेतील गुणवत्तेचे प्रमाण ‘पार्टिक्युलेट मॅटर’मध्ये

209 - भांडुप
100- बीकेसी
115 - चेंबूर
101- माझगाव
128- नवी मुंबई

Web Title: In the wake of the Mumbai blasts, due to the huge change in the environment, the strange weather has caused Mumbaiites to suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई