वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:29+5:302021-05-21T04:07:29+5:30

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यभरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईत बहुतांश ठिकाणी आता ...

Walk for health or to bring Corona home? | वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?

वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी ?

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबईसह राज्यभरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईत बहुतांश ठिकाणी आता कठोर निर्बंधांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. विशेषत: वॉकसाठी सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे प्रमाण अधिक असून, हा वॉक कोरोना तर घरात घेऊन येणार नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मधल्या काळात लोकलसह इतर काही घटक खुले झाले आणि कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली. विशेषत: पश्चिम उपनगरात झपाट्याने कोरोनाचा प्रसार झाला. धारावीतदेखील पुन्हा रुग्णांची संख्या वाढली. परिणामी पुन्हा कठोर निर्बंध जारी करण्यात आले. आता मुंबई महापालिकेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांनी मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आलेख आता पुन्हा खाली येत आहे. मात्र, याच काळात वॉकसाठी सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर पडत असलेल्या मुंबईकरांचे प्रमाण वाढते आहे.

मुंबईच्या समुद्रकिनारी अथवा मोठ्या उद्यान परिसरात पोलिसांची गस्त सुरू असल्याने मुंबईकर वॉकसाठी त्या परिसरात फिरकत नाहीत; परंतु कॉलनी परिसरात सकाळी आणि सायंकाळी वॉकसाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. विशेषत: सकाळी हे प्रमाण अधिक असते. कॉलनीमधील पुरुषांसोबत महिलादेखील वॉकसाठी बाहेर पडल्याचे चित्र अधिक असते. याहून महत्त्वाचे म्हणजे अनेकवेळा हा वॉक समूहाने केला जातो. परिणामी संसर्ग होण्याची भीती अधिक असते. अनेकवेळा तर हा वॉक रात्री दहानंतरदेखील केला जातो. अनेक कॉलनीमध्ये महिला समूहाने जेवण केल्यानंतर हा वॉक करतात. शिवाय यात अनेकांनी मास्कदेखील घातलेला नसतो.

-------------

पोलिसांची गस्त

मुंबई शहर आणि उपनगरात कठोर निर्बंध पायदळी तुडविणाऱ्यांवर पोलिसामार्फत कारवाई केली जाते. अनेकवेळा सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री पोलिसांची गाडी गस्त घालत असते. वॉक करणाऱ्यांनादेखील पोलिसांकडून समज दिली जाते.

-------------

संसर्ग होण्याचा धोका

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे; परंतु तरीही लोक मार्निंग वॉर्कसाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. यामुळे गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यातच अनेक नागरिक कोरोनाची भीती न बाळगता, चेहऱ्याला मास्क न लावता वावरताना पाहायला मिळतात. अशा नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय या नागरिकांनामुळेही इतरांना संसर्ग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क परिधान करणे, नियमित हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे.

- डॉ. अरविंद काटे, फुफ्फुसरोग तज्ज्ञ.

-------------

घरातही तुम्ही ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता

कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन करण्यात आला असताना लोक जॉर्गिग पार्कमध्ये अनावश्यक गर्दी करत आहेत. माॅर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडताना कमी गर्दी असलेल्या रस्त्यांची निवड करा. ब्रिस्क वॉक आणि जॉगिंग यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम करत असताना शरीराला ऑक्सिजनची जास्त आवश्यकता असते. अशावेळी चेहऱ्यावर मास्क लावू नयेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे; परंतु व्यायाम करत असताना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी इतरांपासून किमान १२ फूट अंतर ठेवावे. याव्यतिरिक्त घरातही तुम्ही ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता, हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. नियमित प्राणायाम करणेही खूप उपयुक्त आहे. याशिवाय दररोज आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करा.

- डॉ. समुद्रिका पाटील

-------------

खुली हवा नव्हे कोरोनाचे विषाणू

लोक मार्निंग वॉर्कसाठी घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. यामुळे गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे; परंतु व्यायाम करत असताना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी इतरांपासून किमान १२ फूट अंतर ठेवावे.

Web Title: Walk for health or to bring Corona home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.