पहिला डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लाभार्थींसाठी वॉक-इन पद्धत झाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:07 AM2021-05-26T04:07:03+5:302021-05-26T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. मात्र, पालिकेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतर्फे मुंबईच्या 227 वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. मात्र, पालिकेच्या कालच्या सुधारित लसीकरण परिपत्रकात
त्रुटी असून, फक्त 50 ते 60 टक्केच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य होत आहे, अशी कैफियत शिवसेना प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक 7 च्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे मांडली होती. सदर योजनेमध्ये 45 वयोगटातील पहिल्या मात्रेच्या लाभार्थींचा समावेश नाही. यामध्ये पालिकेच्या पैशाच्या आणि मनुष्यबळाचा विनियोग होत आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षांवरील लाभार्थींसाठी वॉक-इन पद्धत सुरू झाली पाहिजे, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती.
यासंदर्भात काल लोकमत ऑनलाइनवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. लोकमत ऑनलाइनची बातमी पालिका प्रशासन व राजकीय वर्तुळात व्हायरल झाली होती. शीतल म्हात्रे यांनीसुद्धा ‘लोकमत’ची बातमी मान्यवरांना ट्वीट केली होती. आपल्या पाठपुराव्यामुळे आणि ‘लोकमत’च्या वृतामुळे अखेर आजपासून सदर वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले, असे त्यांनी सांगितले.
आजपासून पहिला डोस घेणाऱ्या सदर योजनेमध्ये वरील लाभार्थींसाठी वॉक-इन पद्धत सुरू झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने ट्वीट करून दिली होती.