सीएसएमटी रेल्वेस्थानकाची हरितस्थानकाच्या दिशेने वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 02:00 AM2021-03-02T02:00:35+5:302021-03-02T02:00:42+5:30
इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वेस्थानकाची हरितस्थानकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या स्थानकाला सीआयआयच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून ग्रीन रेल्वे स्टेशन रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे पश्चिम विभाग आणि महाराष्ट्रातील पहिले स्थानक ठरले आहे.
इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरमितसिंग अरोरा यांच्याकडून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. मित्तल यांनी विविध हरित उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याबद्दल मध्य रेल्वे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर रेल्वे अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या टीमचे कौतुक केले.
प्रवाशांचा अनुभव वाढविण्यासाठी आणि देशभरातील रेल्वेस्थानकांवरील ऊर्जा आणि पाण्याचा वापर कमी करण्यासाठी आयजीबीसी ग्रीन रेल्वे स्टेशन रेटिंगचा काय परिणाम होतो हे जाणून मित्तल यांनी आनंद व्यक्त केला, तर अरोरा म्हणाले की, या कामगिरीमुळे देशभरातील रेल्वे सुविधा आणि रेल्वे अखत्यारितील प्रकल्पांना हरित मार्गाने जाण्यास प्रोत्साहन मिळेल. सीआयआय-आयजीबीसी भारतीय रेल्वेबरोबर ग्रीन डीआरएम इमारती, ग्रीन रेल्वे शाळा / रुग्णालये/प्रशिक्षण केंद्रे आणि ग्रीनको (कार्यशाळांसाठी) इत्यादी अनेक हरित उपक्रमांवर बारकाईने काम करत आहे.
रेल्वेस्थानकाची ठळक वैशिष्ट्ये
nदिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी अनुकूल अशी स्टेशनची रचना करण्यात आली आहे.
nपार्किंगमध्ये इलेक्ट्रिक २ आणि ४ व्हिलरला प्रोत्साहन देण्यासाठी ५ टक्के पार्किंग स्पेससाठी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट्स
nस्थानकावर च्या जागेच्या १५ टक्क्यांहून अधिक जागा झाडे आणि छोट्या उद्यानांनी व्यापलेली आहे.
nविविध कार्यालये आणि वेटिंग रूममध्ये बसवलेले १७ ऑक्युपेशन सेन्सर्स
nस्टेशनवर निर्माण होणाऱ्या ८३ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि यापैकी १०० टक्के पाणी स्थानकात वापरले जाते.
nवायफाय, ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन, टुरिझम इन्फॉर्मेशन अँड बुकिंग सेंटर, फूड कोर्ट, फार्मसी अँड मेडिकल सुविधा इ.