बोरीवलीत रंगणार ‘वॉकेथॉन’
By admin | Published: December 10, 2014 12:39 AM2014-12-10T00:39:33+5:302014-12-10T00:39:33+5:30
बोरीवली पश्चिमेला ‘प्लेटलेट दान’विषयी जनजागृती करण्यासाठी विशेष अशा ‘वॉकेथॉन’चे रविवार 21 डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे.
Next
बोरीवली : येथील बोरीवली एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थी संघटना आणि टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिमेला ‘प्लेटलेट दान’विषयी जनजागृती करण्यासाठी विशेष अशा ‘वॉकेथॉन’चे रविवार 21 डिसेंबरला आयोजन करण्यात आले आहे.
कॅन्सर, डेंग्यू, कुष्ठरोग, मलेरिया यासारख्या गंभीर आजारातील रुग्णांना प्लेटलेट संक्रमणाची आवश्यकता असते. मात्र या प्लेटलेट दानाविषयी अनेकांना काही गैरसमज असल्याने सहजासहजी कोणी प्लेटलेट दान करण्यासाठी पुढाकार घेत नाही. सर्वसामान्यांमध्ये असलेले हे अज्ञान दूर करण्यासाठी या माजी विद्यार्थी संघटनेकडून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
5 किमीच्या या वॉकेथॉनला बोरीवली पश्चिमेकडील एमएचबी कॉलनी येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानातून सकाळी 6.3क् वाजता सुरुवात होईल. यानंतर योगी नगर-लिंक रोडमार्गे पुन्हा अरुणकुमार वैद्य मैदानात या वॉकेथॉनची समाप्ती होईल. यामध्ये 7 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी 2.5 किमी तर 18 वर्षावरील व्यक्तींसाठी 5 किमी अंतर असेल. त्याचबरोबर ही स्पर्धा नसून केवळ प्लेटलेट दान करण्याबाबत जनजागृती असल्याने या वेळी कोणाचीही विजयी म्हणून निवड करण्यात येणार नाही. मात्र यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात येणार आहे.
दरम्यान, या वेळी इच्छुक प्लेटलेट दान करणा:यांची विशेष तपासणी करण्यात येणार असून याद्वारे ती व्यक्ती प्लेटलेट दान करण्यासाठी योग्य आहे की नाही हे पडताळले जाईल. तसेच परिसरातील शाळा-कॉलेज विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, व्यावसायिक, गृहिणी यांसारख्या तब्बल 2 हजारांहून व्यक्तींचा सहभाग लाभेल, असा विश्वास आयोजकांना आहे.
या वॉकेथॉनचे आयोजक व बोरीवली एज्युकेशन सोसायटीच्या 1984 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी डॉ. निमेश मेहता यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, आज रक्तदान करण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र प्लेटलेट दानासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुळात रक्तदान व प्लेटलेट दान यातील फरक आम्हाला या वेळी नागरिकांना सांगायचा आहे.
या उपक्रमानंतर निश्चितच समाजामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. (प्रतिनिधी)
च्इच्छुक प्लेटलेट दान करणा:यांची विशेष तपासणी करण्यात येणार असून याद्वारे ती व्यक्ती प्लेटलेट दान करण्यासाठी योग्य आहे की नाही हे पडताळले जाईल.
च्रक्तदान करण्यासाठी अनेक जण पुढे येतात, मात्र प्लेटलेट दानासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मुळात रक्तदान व प्लेटलेट दान यातील फरक आम्हाला या वेळी नागरिकांना सांगायचा आहे.