लालबागमध्येही ‘माणुसकी’ची भिंत

By Admin | Published: January 6, 2017 05:00 AM2017-01-06T05:00:33+5:302017-01-06T12:47:30+5:30

प्रमिला पवार, मुंबई महाराष्ट्रातल्या नागपूर येथे ‘माणुसकीची भिंत’चे बीज रोवले गेले, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘व्हायरल’ झालेल्या संकल्पनेचा आता ...

The wall of Manusaki also in Lalbagh | लालबागमध्येही ‘माणुसकी’ची भिंत

लालबागमध्येही ‘माणुसकी’ची भिंत

googlenewsNext

प्रमिला पवार, मुंबई
महाराष्ट्रातल्या नागपूर येथे ‘माणुसकीची भिंत’चे बीज रोवले गेले, त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘व्हायरल’ झालेल्या संकल्पनेचा आता वटवृक्ष होताना दिसतो आहे. विविध शहरांत ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू झाला आणि मग या ओलाव्याने समाजातील दुर्लक्षित, वंचितांना आधार मिळू लागला. याचेच प्रतिबिंब सध्या लालबाग परिसरात ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून अनुभवण्यास मिळते आहे.
नवीन वर्षाचे औचित्य साधून आधार युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींची मदत मिळत आहे. आधार युवा प्रतिष्ठानचा हा पहिलाच उपक्रम असून मुंब्रा, दिवा, ठाणे, कल्याण अशा परिसरातूनदेखील लोक दान करण्यासाठी येतात, असे प्रतिष्ठानचे खजिनदार किरण तरसे यांनी सांगितले. चार दिवसांत जवळजवळ १५० हून गरजवंतांना वापरण्याजोगे कपडे व उबदार कपड्यांचे वितरण करण्यात आले. तसेच या प्रतिष्ठानचे स्वयंसेवक रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना भेटूनही येथून कपडे घेऊन जाण्याचे आवाहन करत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय मोळीक यांनी दिली. समाजाच्या तळागाळातील गरजवंतांना साहाय्य करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हा उपक्रम ७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून दानशूर आणि गरजवंतांनी यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आधार युवा प्रतिष्ठानने केले आहे.

https://www.dailymotion.com/video/x844neo

Web Title: The wall of Manusaki also in Lalbagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.