‘त्या’ भिंतीची पुनर्बांधणी करणार
By Admin | Published: June 26, 2016 03:21 AM2016-06-26T03:21:32+5:302016-06-26T03:21:32+5:30
पारसिक बोगद्यावरील त्या धोकादायक भिंतीची आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठाणे महापालिका पुनर्बांधणी करणार आहे. रेल्वेची कुठलीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने पारसिक
मुंब्रा : पारसिक बोगद्यावरील त्या धोकादायक भिंतीची आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली ठाणे महापालिका पुनर्बांधणी करणार आहे. रेल्वेची कुठलीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने पारसिक बोगद्यावर ठामपाने ही भिंत बांधली होती. मात्र, अतिक्रमणासह अतिपावसामुळे ती धोकादायक बनून मंगळवारी तिचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर, ठामपाने या भिंतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला असल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.
पारसिक बोगद्यावरील उदयनगरमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. तिच्या देखभालीकडे तसेच मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पडझडीकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी तिचा काही भाग रेल्वे रु ळांच्या बाजूने कलला होता. स्थानिक नागरिकांची जागरूकता तसेच शासकीय यंत्रणांनी वेळीच धावपाळ करून भिंतीचा तो धोकादायक भाग काढून टाकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. परंतु, त्या भिंतीमुळे जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने तसेच भिंतीचा धोकादायक भाग पाडण्यासाठी घेतलेल्या एक तासाच्या विशेष मेगाब्लॉकमुळे मंगळवारी दिवसभर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. यामुळे सतर्क झालेल्या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.
रेल्वे अधिकारांचे राहणार लक्ष
विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकाने या भिंतीच्या दुरवस्थेबाबत कळवूनसुद्धा ठामपाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याकडे पुरते दुर्लक्ष केले होते. याविषयी लोकमतने आवाज उठवल्यानंतर जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली लवकरच या भिंतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक नागरिकांची जागरूकता तसेच शासकीय यंत्रणांनी वेळीच धावपाळ करून भिंतीचा तो धोकादायक भाग काढून टाकल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र विशेष मेगाब्लॉकमुळे मरे वेळापत्रक कोलमडले.