भटक्या कुत्र्यांचा १० जणांना चावा

By admin | Published: September 21, 2014 11:59 PM2014-09-21T23:59:11+5:302014-09-21T23:59:11+5:30

महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांनी दहा जणांना चावा घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Wandering dogs bite 10 people | भटक्या कुत्र्यांचा १० जणांना चावा

भटक्या कुत्र्यांचा १० जणांना चावा

Next

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांनी दहा जणांना चावा घेतल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बिरवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. बिरवाडीमध्ये चायनिज फास्ट फूड, वडापाव, हॉटेल यांची संख्या वाढल्याने या हॉटेल्समधून वाया गेलेले अन्न भटक्या कुत्र्यांना खुराक म्हणून टाकले जाते. याचा परिणाम म्हणून या परिसरात आजूबाजूचे कुत्रेही सोडले जात आहेत. नागरिक भटक्या कुत्र्यांमुळे हैराण होत असतानाच प्रशासन मात्र शासनाच्या कायदे व प्राणी मित्र संघटनांच्या अवास्तव धोरणांनी हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसात बिरवाडी परिसरात दहा विद्यार्थी व ग्रामस्थांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळाली आहे. याला वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी दुजोरा दिला. लहान मुलांनाही चावा घेतल्याचे स्पष्ट केलेले आहे. बाधित झालेले नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Wandering dogs bite 10 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.