वंजारी समाजालाही हवे अनुसूचित जमातीत आरक्षण
By admin | Published: August 21, 2014 01:33 AM2014-08-21T01:33:31+5:302014-08-21T01:33:31+5:30
वंजारी समाजाला भटक्या जमातीमधील - ड (एनटी-डी) प्रवर्गात 2 टक्क्यांऐवजी 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी बुधवारी आझाद मैदानात झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात करण्यात आली. वं
Next
मुंबई : वंजारी समाजाला भटक्या जमातीमधील - ड (एनटी-डी) प्रवर्गात 2 टक्क्यांऐवजी 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी बुधवारी आझाद मैदानात झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात करण्यात आली. वंजारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत (एसटी) करण्याचा एल्गार करण्यात आला.
वंजारी समाजासह सर्वच भटक्या जमातींचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची गरज आहे. वंजारी समाजाच्या आर्थिक विकासासाठी वसंतराव नाईक महामंडळ आहे. मात्र विकासाच्या योजना राबवण्यासाठी महामंडळाच्या तिजोरीत पैसा नाही. त्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याची गरज आमदार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली. महामंडळाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. ऊस तोडणी करणा:या वंजारी समाजाच्या मुलांसाठी बांधलेल्या कच्च्या स्वरूपातील शाळांचे पक्के बांधकाम करण्याची मागणी त्यांनी केली.