मुंबई लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात वंजारी युवक संघटननेने घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:19 PM2020-03-02T17:19:42+5:302020-03-02T17:19:52+5:30
वंजारी युवक संघटना एमपीएससी कार्यालयात आक्रमक
मुंबई : पीएसआय भरती साठी जागा राखीव न ठेवल्याने हे वंजारी युवक संघटना आक्रमक झाली आणि त्यांनी मुंबई लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात जाऊन बोर्डवर अंडी फेकून अधिकाऱ्याला काळ फसण्याचा प्रयत्न केला आहे.
28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आलेली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या जाहिरातीमध्ये एनडी साठी आरक्षित जागा नसल्याचे निदर्शनास आले होते. पंकजा मुंडेनी ट्विटद्वारे ही बाब लक्षात आणून दिल्यावर याबाबत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले होते त्यानंतर हा गोंधळ आज पाहायला मिळत आहे.
शासनाच्या संबंधित विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्राच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून राबविण्यात येते. त्यामुळे पदसंख्या तसेच आरक्षण हा विषय संपूर्णतः शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्यात बदल करण्याची मुभा आयोगाला नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पंकजा मुंडे च्या निवेदनाला तसेच उमेदवारांना देण्यात आले आहे