Mhada Lottery Mumbai 2023: मुंबईत घर हवे; मग म्हाडाचा अर्ज भरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:44 AM2023-05-22T06:44:16+5:302023-05-22T22:05:52+5:30

Mumbai: म्हाडाच्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणा - स्वीकृतीला सुरुवात होणार आहे.

Want a house in Mumbai; Then fill the application of MHADA, lottery will be announced for 4830 houses today | Mhada Lottery Mumbai 2023: मुंबईत घर हवे; मग म्हाडाचा अर्ज भरा

Mhada Lottery Mumbai 2023: मुंबईत घर हवे; मग म्हाडाचा अर्ज भरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणा - स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे.

सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. दलाल प्रलोभने देऊन फसवणूक करत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व  सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे. 

२७८८ घरे 
अत्यल्प उत्पन्न गटात पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, ॲन्टॉप हिलमधील ४१७ तर विक्रोळीच्या  कन्नमवार नगरमधील ४२४ अशा एकूण २,७८८ सदनिका समाविष्ट आहेत.

१०३४ घरे 
अल्प उत्पन्न गटात एकूण १०३४ सदनिका असून, गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ सदनिकांचा त्यात समावेश आहे. उर्वरित सदनिका लोकमान्यनगर दादर, ॲन्टॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डी. एन. नगर - अंधेरी, पंतनगर - घाटकोपर, कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीरनगर कांदिवली,  जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणच्या सदनिकांचा समावेश आहे.

१४० घरे 
मध्यम उत्पन्न गटासाठी मंडळाने १४० सदनिका उपलब्ध केल्या असून, या सदनिका उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकारनगर चेंबूर, लोकमान्यनगर दादर, ॲन्टॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबूर, चांदिवली पवई, गायकवाडनगर मालाड, प्रतीक्षानगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.

१२० घरे 
उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिकांचा समावेश असून, या सदनिका जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत.

कसा कराल अर्ज...

     अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक.
     नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अर्ज सादर करण्याकरिता २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत.
     अर्जासोबत आवश्यक असलेली उत्पन्न गटनिहाय 
अनामत रक्कम क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरण्यासाठी २६ जून रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत.
     अनामत रकमेचा भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करण्यासाठी २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
     सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in व https://www.mhada.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध होईल.
     प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे व हरकती ७ जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील.
     सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी तीन वाजता संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येईल.
 

Web Title: Want a house in Mumbai; Then fill the application of MHADA, lottery will be announced for 4830 houses today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा