Join us  

कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचंय; 'वर्षा'वरील बैठकीत आदेश; २ बसमधून आमदार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 8:47 PM

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने आमदारांना ४ दिवस मुंबईच्या रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या २ उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने(Shivsena) रणनीती आखली आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेसह काही अपक्ष आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदारांना २ बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे. 

या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीत कुठलाही घोडा विक्रीला नाही तर घोडेबाजार कसा होईल? या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदारांसह पक्षाला पाठिंबा देणारे अपक्षही आमदार उपस्थित होते. ४ दिवस आता बाहेर राहणार आहोत असं त्यांनी सांगितले. वर्षा बंगल्याबाहेर आमदारांना नेण्यासाठी २ बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. आमदारांची बैठक पार पडल्यानंतर या आमदारांना बसमधून हॉटेल रिट्रिटमध्ये नेण्यात येईल. याठिकाणी शिवसैनिकही पहारा देणार आहेत. पोलिसांकडून तगडा सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बसेसमध्ये केवळ आमदार असतील अन्य कुठलाही व्यक्ती नसेल यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. वर्षा बंगल्यावरून बाहेर पडून आमदार बसेसमध्ये बसत होते. 

तर १० तारखेला शिवसेनेचे २ खासदार आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. आजच्या बैठकीला शिवसेनेसह इतर अपक्ष आमदार उपस्थित होते. पक्षनेतृत्वाचा आमच्यावर विश्वास आहे. ही लढाई आहे त्यासाठी आम्हाला एकत्र राहायला सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्याला जिंकायचं आहे. कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं आहे असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना देण्यात आले आहेत. 

राज्यसभा निवडणुकीआधी पॉलिटिकल ड्रामाराज्यसभेच्या सहा जागेसाठी राज्यात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर आता भाजपाच्या आमदारांची ८ तारखेला बैठक होणार आहे. तर मंगळवारी काँग्रेस आमदारांचीही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला येताना बॅगा घेऊन या अशी सूचना काँग्रेसच्या आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराज्यसभा