कोरोनाबाधितांसाठी वॉर रूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:36+5:302021-04-05T04:06:36+5:30
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी पालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या ...
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी पालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली जून २०२० पासून अंमलात आणली आहे. सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहेत. कोविडबाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांनी मदत हवी असेल तर वॉर्ड वॉर रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’मध्ये तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉर रूममुळे कोरोनाबाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा दिली जात आहे. गरजू कोरोनाबाधितांना तत्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत असल्याने रुग्णवाहिकांचा प्रतिसाद कालावधी वाढला आहे.