Join us

अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 7:52 AM

MNS News : राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली.

मुंबई : राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार केले आहे. यात एक मनसे नेता आणि एक सरचिटणीस यांचा समावेश असेल. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे.बुधवारी कृष्णकुंजवर झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक  वाॅर्ड स्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवरचा आढावा घेतला जाईल.  त्याचा सविस्तर अहवाल  तयार करून ताे   २५ फेब्रुवारीपर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला जाईल, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.मुंबईतील लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यादक्षिण मुंबई - नितीन सरदेसाई आणि मनोज चव्हाण, दक्षिण मध्य - अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम, उत्तर पूर्व - अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे, उत्तर मध्य - संजय चित्रे आणि राजा चौघुले, उत्तर पश्चिम - शिरीष सावंत आणि आदित्य शिरोडकर, उत्तर मुंबई - बाळा नांदगावकर आणि संजय नाईक.

टॅग्स :मनसेअमित ठाकरे