मुंबई : चक्रीवादळामुळे संपूर्ण मुंबईतच झाडे जागोजागी उन्मळून पडली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक ६०मध्ये वर्सोवा लोखंडवाला व आरटीओ लेनमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली होती आणि अनेक ठिकाणी झाडे अर्धवट तुटलेली होती. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते ब्लॉक झाले होते.
प्रभाग क्रमांक ६० चे नगरसेवक योगिराज दाभाडकर यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागातील उन्मळून पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा केला. ही झाडे आधी कापून मग उचलणे यासारख्या गोष्टी वेळखाऊ असल्याने जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, नगरसेवक योगिराज दाभाडकर यांनी स्वखर्चाने जेसीबी, डंपर आणि कामगारांच्या मदतीने सकाळी सात वाजल्यापासून स्वत: उभे राहून झाडे उचलण्यास सुरुवात केली आणि येथील रस्त्यांवरील अडथळा दूर केला. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
------------------------------