Join us

प्रभाग क्र. ६१ मध्ये सर्वाधिक निधी खर्च

By admin | Published: March 15, 2015 10:35 PM

वसई पूर्वेस वालीव येथे हा प्रभाग असून या प्रभागामध्ये औद्योगिक कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रभागामधून महानगरपालिकेला चांगला महसूल

दीपक मोहिते , वसईवसई पूर्वेस वालीव येथे हा प्रभाग असून या प्रभागामध्ये औद्योगिक कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रभागामधून महानगरपालिकेला चांगला महसूल उपलब्ध होत असल्यामुळे एकूण ८९ प्रभागापैकी सर्वाधिक आर्थिक निधी या प्रभागातील विकासकामांवर खर्च करण्यात आला. सुमारे ७० ते ८० कोटीची विकासकामे केल्याचा दावा नगरसेवक किशोर धुमाळ यांनी केला आहे. यामध्ये रस्ते, गटारे व अन्य विकासकामांचा समावेश आहे.वालीव, गोलानी, दिवाण व शहा औद्योगिक वसाहत, खोलेकरपाडा, शिवभीमनगर, नाईकपाडा, धुमाळनगर, एव्हरशाईन नगरी व वालीव नाका या परिसराचा या प्रभागामध्ये समावेश आहे. गेल्या साडेचार वर्षात उद्यान, तलाव सुशोभीकरण, नदीला संरक्षक भिंत, औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पुनर्बांधणी, बोअरींग करणे इ. विकासकामे करण्यात आली. या प्रभागामध्ये अनेक कारखान्यांना घरपट्टी लागली नव्हती. ती लावण्यात आल्यामुळे या औद्योगिक क्षेत्रातून महानगरपालिकेला प्रचंड प्रमाणात घरपट्टी महसूल प्राप्त होऊ शकला. काही प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या गोदामांचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ग्रामपंचायतीच्या काळात ही अनधिकृत बांधकामे झाल्याचा दावा नगरसेवकाकडून केला जातो. या प्रभागातही पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. पाणी योग्य प्रमाणात मिळत नसल्यामुळे नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागते. पाण्याची गरज लक्षात घेऊन विविध ठिकाणी १५ बोअरींग घेण्यात आल्या आहेत. पाण्याचा प्रश्न वगळता अनेक विकासकामे मार्गी लागल्याचे नगरसेवक धुमाळ यांचे म्हणणे आहे.