उरणमध्ये गोदामे ठरताहेत जीवघेणी

By Admin | Published: April 10, 2015 10:52 PM2015-04-10T22:52:16+5:302015-04-10T22:52:16+5:30

तालुक्यात अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प येत आहेत आणि त्यातून गोदामांची संख्याही वाढत चालली आहे. पर्यायाने शेतक-यांच्या जमिनीवर गोदामे

Warehouses in Uran are making life threatening | उरणमध्ये गोदामे ठरताहेत जीवघेणी

उरणमध्ये गोदामे ठरताहेत जीवघेणी

googlenewsNext

उरण : तालुक्यात अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प येत आहेत आणि त्यातून गोदामांची संख्याही वाढत चालली आहे. पर्यायाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर गोदामे, कंपन्या उभ्या राहिल्या. गावाच्या चारही बाजूंनी कंपन्याच कंपन्या अशी परिस्थिती उरणमधील काही गावांची झाली आहे. त्यातही विशेषत: उरणच्या महालन व पूर्व विभागाचा यात उल्लेख करावा लागतो.
उरणच्या महालन व पूर्व विभागात खाजगी कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे. तेथील गावांनाच त्यांनी चारही बाजंूनी घेरले आहे. गोदामे म्हणून जागा घेतली, मात्र या गोदामात रिकाम्या कंटेनरबरोबरच घातक ज्वलनशील पदार्थ असल्याने गावकरीवर्ग जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. परदेशी कंपन्यांचा हा साठा अनेकदा तसाच गोदामात पडून असतो. जेएनपीटी व परिसरामध्ये घातक रसायनांना, स्फोटक ज्वलनशील पदार्थांना बंदी असताना या प्रकल्पांना अथवा कंपन्यांना परवानगी देतो कोण? तसेच या समस्यांकडे महसूल विभाग, प्रदूषण विभाग तसेच पोलीस यंत्रणा का दुर्लक्ष करते, अशी चर्चा या परिसरात सुरू आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०१४ मधील द्रोणागिरी विभागात न्यू मर्क्स गोदामात झालेल्या घातक रसायन टँकरचा स्फोट नागरिकांना भयभीत करणारा असाच होता. उरणमध्ये ओएनजीसी, बीपीसीएल, एनएडीसारखे स्फोटक प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात अशा घातक रसायनांच्या ने-आण करण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, मात्र संबंधित विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
आयओटी कंपनीत म्हणजेच प्रकल्पात नाफ्ता आॅइलची चोरी होत आहे. हे काही महिन्यांपूर्वीच सिद्ध झाले. महसूल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: Warehouses in Uran are making life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.