Join us  

आषाढीवारी पायी चालत जाणेसाठी आझाद मैदान मुंबई येथे वारकरी मंडळाचे भजन आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 7:06 PM

आषाढी वारी पायी चालत करणेसाठी शासनाने अधिकृत परवानगी देऊन वारकरी परंपरा जतन व्हावी, संस्कृती चा सांभाळ व्हावा या साठी आझाद मैदान, मुंबई येथे प्रतिनिधीक " भजन आंदोलन " केले आहे.

मुंबई: आषाढी वारी पायी चालत करणेसाठी शासनाने अधिकृत परवानगी देऊन वारकरी परंपरा जतन व्हावी, संस्कृती चा सांभाळ व्हावा या साठी आझाद मैदान, मुंबई येथे प्रतिनिधीक "भजन आंदोलन" केले आहे. आरोग्य विभागाचे नियम पळून आंदोलन केले. वारकरी परंपरेमध्ये "आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||" या उक्ती प्रमाणे वारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने, श्रद्धा पूर्वक सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती.केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते.आत्ता फक्त राज्य शासन निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे.

आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासनारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान ५० भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी ही नम्र विनंती संबंधित शासन निर्णय बदलून सहकार्य करावे असे लेखी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले  (जिल्हा अध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष), गोविंद ताटे, इ. पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :पंढरपूर वारीमुंबई