Join us

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबईकर ऊकाड्याने हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 5:09 PM

मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे.  

 

मुंबई : मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे.  विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कमाल तापमान ४६ अंशापर्यंत दाखल झाले आहे. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढा राहणार असून, २५ आणि २६ मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र  राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २७ अंशाच्या आसपास राहील.  

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथील  काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबईकरांना कमाल तापमानाचा तडाखा कमी बसत असला तरी देखील वाढत्या ऊकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

--------------------

२५ मे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल.२६ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.२७ मे : विदर्भ येथे उष्णतेची लाट येईल.--------------------

तापलेली शहरे जळगाव ४५मालेगाव ४४.४सातारा ४०.१सोलापूर ४४.२औरंगाबाद ४२.२परभणी ४५.४नांदेड ४४अकोला ४६अमरावती ४५.६बुलडाणा ४३चंद्रपूर ४५.६गोंदिया ४५.४नागपूर ४६.५वाशिम ४२.६वर्धा ४५.५

टॅग्स :उष्माघातमहाराष्ट्रमुंबई