मुंबई : वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असलेल्या मान्सूनने रविवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली. रविवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, मुंबई, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगडचा काही भाग, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल असून, येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातसह मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारसह उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात दाखल होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मान्सून रविवारी मुंबईत दाखल असला तरी दिवसभर पावसाने येथे विश्रांती घेतली. आता मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याशिवाय मंगळवारी नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.१४ जून रोजी मान्सूनने वेगाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येत्या पाच दिवसांत म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागरत्नागिरी जिल्ह्यात पावसाची रिमझिमरत्नागिरी : गेले दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली होती. सकाळी रिमझिम कोसळणाºया पावसाने दुपारनंतर दडी मारली होती. रविवारपर्यंत कोसळलेल्या पावसाची सरासरी ३८६.२२ मिलिमीटर इतकी नोंद झाली आहे.दिवसभर उघडीप व सायंकाळी पाऊस असे वेळापत्रक असणाºया पावसाचे रविवारचे वेळापत्रक मात्र बदलले होते. सकाळी सरीवर कोसळलेल्या पावसाने नंतर विश्रांतीच घेतली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना जोर आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 2:35 AM