Join us

सावधानतेचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या सलग 4 थ्या दिवशीही 8 हजार पार 

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 9:59 PM

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे.

मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या काही दिवसांपासून हा आकडा जवळपास 8 हजारांच्या पुढेच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा 8 हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली. 

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रूग्ण आणि दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्या मर्यादित झाल्याने राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ६७ हजारांवर पोहचली आहे. सरकारने कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. 

राज्यात आज 8623 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3648 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2020951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 72530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14% झाले आहेत. त्यामुळे, आणखी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.  वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरातही विविध निर्बंधांबाबत चाचपणी सुरू आहे. आज दिवसभरात ८ हजार ३३३ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. तर, दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५२ हजार ४१ नागरिक कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे.

खासगी लसीकरणासाठी 250 रुपये

देशातील सरकारी रुग्णालयांत कोरोना लसिकरण मोफत होईल, असे सरकारने पूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जाती

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसराजेश टोपे