Weather Updates Mumbai: मुंबई आणि ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकणात पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 10:36 AM2022-03-12T10:36:52+5:302022-03-12T10:37:01+5:30

गुजरातसह संपूर्ण विदर्भ व मुंबई, ठाणे, डहाणू, जव्हार, पेठ, सुरगाणा, नवापूर, नंदुरबार, अकराणी, तळोदा, अक्कलकुवा व सभोवतालच्या भागात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात अधिक वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.

Warning of heat wave to Mumbai and Thane; Rain in Konkan | Weather Updates Mumbai: मुंबई आणि ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकणात पाऊस

Weather Updates Mumbai: मुंबई आणि ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; कोकणात पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात १२ मार्चला वीजा, गडगडाटसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असतानाच आता दुसरीकडे मुंबई आणि ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. १० मार्च रोजी मुंबईसह कोकण व विदर्भात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा २ - ३ डिग्रीने वाढून या भागात ३५ डिग्रीवर होते.

गुजरातसह संपूर्ण विदर्भ व मुंबई, ठाणे, डहाणू, जव्हार, पेठ, सुरगाणा, नवापूर, नंदुरबार, अकराणी, तळोदा, अक्कलकुवा व सभोवतालच्या भागात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात अधिक वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. गुजरातसह महाराष्ट्रात पुढील २४ तासात हळूहळू उष्णतेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

गेल्या २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

१२ मार्चला कोकणात पाऊस
nकोकण, गोव्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
nविदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. 
n१२ मार्च रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर १३, १४ आणि १५ मार्च रोजी राज्यात हवामान कोरडे राहील.

Web Title: Warning of heat wave to Mumbai and Thane; Rain in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.