कामगारविरोधी धोरणांविरोधात संपावर जाण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:59 AM2018-12-06T05:59:14+5:302018-12-06T05:59:20+5:30

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी ८ व ९ जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा होणार आहे.

Warning to strike against anti-worker policies | कामगारविरोधी धोरणांविरोधात संपावर जाण्याचा इशारा

कामगारविरोधी धोरणांविरोधात संपावर जाण्याचा इशारा

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी ८ व ९ जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा होणार आहे. या संदर्भात राज्यातही बैठकांना जोर आला असून, सरकारविरोधात एकजूट करण्यासाठी महाराष्ट्रात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने ७ डिसेंबरला परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे.
देशव्यापी संप यशस्वी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली. उटगी म्हणाले की, प्रत्येक संघटनेचे राज्य पातळीवरील ५० नेते व एकूण ४०० प्रतिनिधींची परिषद मुंबईत होईल. भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात दुपारी ३ वाजता परिषदेस सुरुवात होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते, आयटक, सिटू, इंटक, एचएमएस, एनटीयूआय, एआयसीसीटीयू या मध्यवर्ती केंद्रीय कामगार संघटनांचे ज्येष्ठ नेते अध्यक्षीय मंडळात असतील.
या राज्य परिषदेत बँक, विमा, सरकारी क्षेत्रातील सर्व घटक, पोर्ट ट्रस्ट, संरक्षण, विज कामगार, एसटी व बेस्ट कामगार, शिक्षक व प्राध्यापक यांचा समावेश असेल. तर असंघटित क्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, कापड कामगार, बांधकाम कामगार, कंत्राटी कामगार, रिक्षा व टॅक्सी चालक, नगरपालिका कामगार इत्यादी घटकांचा या परिषदेत सहभाग असेल.

Web Title: Warning to strike against anti-worker policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.