Join us

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:36 PM

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात ४ ऑगस्टच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे मुंबई, कोकण आणि मध्य महराष्ट्रासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

२ ऑगस्ट रोजी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्माबाद मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर सिधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. ३, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साता-यासह मराठवाड्यातील काही जिल्हयांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात किनारी प्रदेशात वेगाने वारा वाहील. समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.     

टॅग्स :मानसून स्पेशलपाऊसमुंबईठाणेरायगड