Join us

अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तर - दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता बिहार ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत असून, याचा परिणाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उत्तर - दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता बिहार ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत असून, याचा परिणाम म्हणून पुढील काही दिवस मुंबईलगतच्या परिसरासह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागात, तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. २७ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.