Join us

अवकाळी पावसाचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विदर्भ ते तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विदर्भ ते तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळवर आहे. याचा परिणाम म्हणून राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत असून, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहतील. तर गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, गेल्या काही दिवसांपासून येथील हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे.

----------------------