फेब्रुवारीत होते भाजपत, एप्रिलमध्ये गेले शरद पवार गटात अन् उमेदवारी मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 07:26 IST2024-04-11T07:26:02+5:302024-04-11T07:26:56+5:30
रावेरमधून श्रीराम पाटील, सातारामधून शशिकांत शिंदे लढणार

फेब्रुवारीत होते भाजपत, एप्रिलमध्ये गेले शरद पवार गटात अन् उमेदवारी मिळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटाने दुसऱ्या दिवशी उमेदवारांची तिसरी यादी प्रकाशित करून सातारा आणि रावेर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले. सातारामधून विधानपरिषदेतील आमदार शशिकांत शिंदे, तर रावेरमधून नुकतेच पक्षात प्रवेश केलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात श्रीराम पाटील यांनी भाजपत प्रवेश करत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती, त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता.
माढाचा तिढा कायम
आता केवळ माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल याची प्रतीक्षा आहे. मोहिते-पाटलांची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्याने माढाचा तिढा कायम आहे.