मुंबई- काल शुक्रवारी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर झाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करत त्यांनी सांगितले की, '२००४ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार होते. याबाबत दिल्लीत बैठकाही झाल्या होत्या, जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा मोठा गौप्यस्फोट केला होता. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांनी यावर खुलासा केला आहे.
२००४ मध्येच NCP-BJP-शिवसेना युती होणार होती, पण...; प्रफुल पटेलांचा गौप्यस्फोट
"प्रफुल्ल पटेल त्यावेळी माझ्या घरी येऊन काही तास त्यांनी आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, असा आग्रही विषय मांडला. पण ती गोष्टी शक्य नाही असं मी त्यांना सांगितलं. तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, असंही मी त्यांना सांगितलं, यानंतर ते थांबले. पुढ त्यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी पराभव होऊनसुद्धा पक्षाने त्यांनी केंद्रीय मंत्रिपद दिलं, असंही शरद पवार म्हणाले.
२००४ मध्येच होणार होती युती
- राष्ट्रवादीची २००४ मध्येच भाजपसोबत युती होणार होती. जागावाटपही ठरले होते. पण त्यात त्यावेळी प्रमोद महाजन यांनी खोडा घातला. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना- भाजप यांची युती करण्याचे तेव्हा ठरले होते.- अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून माझ्या घरी बैठक झाली होती. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवण्याचे ठरवले होते. दिल्लीत जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला.-ही युती होणार म्हणून गोपीनाथ मुंढे खुश होते. परंतु चर्चेत मुंढे फारसे सहभागी नव्हते. प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली असती, तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटत होते.- महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिसकटली, असा दावा त्यांनी केला.