येत्या ४८ तासांत धो धो बरसणार, मुंंबईत मेघगर्जनेसह पाऊस; हवामान विभागाचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:12 AM2017-09-16T05:12:45+5:302017-09-16T05:12:56+5:30

\गेल्या तीन दिवसांपासून पहाटेच्या सुमारास पाऊस मुंबईला झोडपून काढत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

Washing in the next 48 hours; Rainfall with thundershowers in Mumbai; Weather forecast | येत्या ४८ तासांत धो धो बरसणार, मुंंबईत मेघगर्जनेसह पाऊस; हवामान विभागाचा इशारा  

येत्या ४८ तासांत धो धो बरसणार, मुंंबईत मेघगर्जनेसह पाऊस; हवामान विभागाचा इशारा  

googlenewsNext

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पहाटेच्या सुमारास पाऊस मुंबईला झोडपून काढत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २४ नोंदविण्यात आले असून, कमाल आणि किमान तापमानात अनुक्रमे ३, ४ अंशांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २८ नोंदविण्यात आले होते. तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.

राज्यातही मुसळधार
१६, १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट
आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Washing in the next 48 hours; Rainfall with thundershowers in Mumbai; Weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई