Join us

येत्या ४८ तासांत धो धो बरसणार, मुंंबईत मेघगर्जनेसह पाऊस; हवामान विभागाचा इशारा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 5:12 AM

\गेल्या तीन दिवसांपासून पहाटेच्या सुमारास पाऊस मुंबईला झोडपून काढत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून पहाटेच्या सुमारास पाऊस मुंबईला झोडपून काढत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस सलग झालेल्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २४ नोंदविण्यात आले असून, कमाल आणि किमान तापमानात अनुक्रमे ३, ४ अंशांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २८ नोंदविण्यात आले होते. तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.राज्यातही मुसळधार१६, १७, १८ आणि १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाटआणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई