म्हाडाच्या वसाहतीत आतापासून बसवण्यात येणार कचरा विघटन यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:44 AM2019-07-29T02:44:03+5:302019-07-29T02:44:16+5:30

कचऱ्याचा प्रश्न सुटणार : पर्यावरण रक्षणास लागणार हातभार

Waste disposal machine to be installed in Mhada settlement from now on | म्हाडाच्या वसाहतीत आतापासून बसवण्यात येणार कचरा विघटन यंत्र

म्हाडाच्या वसाहतीत आतापासून बसवण्यात येणार कचरा विघटन यंत्र

Next

मुंबई : मुंबईमध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना म्हाडाने आपल्या सर्वच नवीन प्रकल्पांमध्ये कचरा विघटन करणारे यंत्र बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची सुरुवात लोअर परळ येथील प्रकाश कॉटन आणि बॉम्बे डाइंग मिल इमारतीपासून करण्यात आली आहे. यामुळे या वसाहतीतील कचºयाचा प्रश्न सुटणार आहे. ओल्या कचºयापासून खत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरण रक्षणास हातभार लागणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने काढलेल्या अध्यादेशानुसार ही योजना सुरू केली आहे. सध्या म्हाडाच्या निमार्णाधीन असणाºया सर्वच प्रकल्पांतील वसाहतींमध्ये कचरा विघटन यंत्र बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना ही योजना लागू करण्याची सक्ती केली आहे, असे म्हाडाच्या एका अधिकाºयाने सांगितले.
म्हाडाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या पाच गृह प्रकल्पांमध्ये ओल्या कचºयाचे विघटन करणारे यंत्र बसवण्यात येणार आहे. इमारतीत किती क्षमतेचे यंत्र बसवायचे हे त्या इमारतीतील लोकसंख्येवर अवलंबून असणार आहे. यासाठी एका व्यक्तीमागे ३ किलो कचरा असा नियम तयार करण्यात आला आहे. साधारणत: एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती याप्रमाणे सदस्य असतात. हा अंदाज गृहीत धरून लोअर परळ येथील प्रकाश कॉटन मिल येथील ३ इमारतींसाठी एकत्रित १ हजार ३०० किलो कचरा विघटन करणारे यंत्र बसवण्यात आले आहे. याची किंमत सुमारे २३ लाख
इतकी आहे. तर बॉम्बे डाइंग= मिलच्या इमारतीसाठी ३८०० किलो कचरा विघटन यंत्र बसवण्यात आले आहे.

रहिवाशांना भुर्दंड नाही!
च्कचरा विघटन यंत्रात कचरा विघटन करून तयार होणारे खत विकण्याचा अधिकार नोंदणीकृत सोसायट्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे कचरा विघटन यंत्रासाठी रहिवाशांकडून अधिकचे पैसे घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे त्याचा रहिवाशांना भुर्दंड बसणार नाही, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Web Title: Waste disposal machine to be installed in Mhada settlement from now on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.