मुंबई : भांडुप पूर्वेकडील श्यामनगर येथील झोपडपट्टीजवळ पाणथळ आणि गवताळ परिसरात डेब्रिज टाकण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात पर्यावरणवाद्यांकडून संबंधित विभागाकडे तक्रार केली असून अद्याप डेब्रिज टाकणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.परिसरात डेब्रिजने भरलेले ट्रक हे पहाटे चारच्या सुमारास येऊन डेब्रिज टाकून जातात. मिठागराकडे येणाºयासाठी नाहूर रेल्वे स्थानक, भांडुप हायवे आणि कांजूर गावातून असे तीन मार्ग आहेत. या तिन्ही मार्गांवर पोलिसांची चौकी आहे. तरीदेखील डेब्रिजचे वाहन आतमध्ये कसे काय दाखल होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका अधिकाºयाने फोन करून सांगितले की, डेब्रिजचे वाहन सापडत नाही. परंतु, तेथे वाहनांच्या चाकांच्या ताज्या खुणा असतात, ते अधिकाऱ्यांना दिसत नाही, अशी माहिती वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी दिली.सदर जागा ही खारभूमी विभागाकडे आहे. त्यांच्या जागेवर महापालिकेचे कोणतेही काम करायचे झाल्यास त्या कामाकरता खारभूमी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय काम करता येत नाही. यापूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले असता खारभूमी विभागाने दिले नाही, अशी माहिती महापालिकेच्या एस विभागातील अधिकाºयाने दिली.
पाणथळ जागेत कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:00 AM