टाकाऊ वस्तूंमधून साकारणार उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 02:24 AM2019-10-27T02:24:39+5:302019-10-27T02:24:45+5:30
यासाठी उद्यान विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई : पुनर्प्रक्रियेद्वारे ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयोग महापालिकेने सुरू केला आहे. परंतु, सुका कचºयाचा प्रश्न जैसे थेच
असल्याने बेस्ट आॅऊट आॅफ वेस्ट करण्यासाठी चंढीगडच्या धर्तीवर मुंबईत रॉक गार्डन उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
यासाठी उद्यान विभागाला निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत दररोज सुमारे सात हजार दोनशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सुका कचºयाची समस्या अद्याप कायम आहे. त्यामुळे चिनी मातीची भांडी, काचेच्या बांगड्या, निरूपयोगी विद्युत उपकरणे, सिमेंटच्या पिशव्या अशा सुक्या कचºयापासून रॉक गार्डन साकारण्याची नगरसेवकांची मागणी पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती.
या ठरावाच्या सुचनेवर घनकचरा विभागानेही सकारात्मक अभिप्राय दिला आहे. पंजाब येथील चढीगड शहरात असे रॉक गार्डन साकारले
आहे. या उद्यानात टाकाऊ वस्तूपासून प्राणी, पक्षी, बाहुली, पुरूष अशा कलाकृती साकारण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुंबईतील प्रत्येक विभागातील उद्यानात असे उद्यान तयार केल्यास सुका कच-याची समस्या सोडविण्यात काही प्रमाणात यश येईल. याबाबतचा प्रस्ताव
घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत तयार करण्यात येणार आहे
मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्र आहेत. हे केंद्र अशासकीय संस्थेद्वारे चालवण्यात येतात. या केंद्रामध्ये सुका कचºयाचे प्लास्टिक, काच अशा वस्तूंचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानंतर या वस्तू अशासकीय संस्थेद्वारे पुनर्चक्रीकरणासाठी पाठविण्यात येते. या कचºयापासून रॉक गार्डन सुरू करण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत तयार करण्यात येत आहे.