कचऱ्याचा भस्मासुर, डम्पिंगही अपुरे, भविष्यात होणार समस्या अधिक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:02 AM2017-09-11T07:02:38+5:302017-09-11T07:02:53+5:30

कचऱ्याच्या समस्येने मुंबईकरांना हैराण केले आहे. ऐन पावसाळ्यात या समस्येने डोके वर काढल्याने, मुंबईची तुंबापुरी झाली. कचरा आणि प्लॅस्टिक या समस्येचे मुख्य कारण असल्याचे म्हणणे

 Waste of the trash, dumping too insufficient, future problems will be more serious | कचऱ्याचा भस्मासुर, डम्पिंगही अपुरे, भविष्यात होणार समस्या अधिक गंभीर

कचऱ्याचा भस्मासुर, डम्पिंगही अपुरे, भविष्यात होणार समस्या अधिक गंभीर

Next

- अक्षय चोरगे 
मुंबई : कचऱ्याच्या समस्येने मुंबईकरांना हैराण केले आहे. ऐन पावसाळ्यात या समस्येने डोके वर काढल्याने, मुंबईची तुंबापुरी झाली. कचरा आणि प्लॅस्टिक या समस्येचे मुख्य कारण असल्याचे म्हणणे, तज्ज्ञ, पर्यावणवादी आणि नागरिकांनी मांडले. पालिकेकडून कचºयाचे व्यवस्थापन होत नसल्याचे म्हणत, काहींनी मुंबईकरांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले. मुंबईकर प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, कचºयाचे वर्गीकरण करत नाहीत, थेट नाल्यांमध्ये व नद्यांमध्ये कचरा फेकतात, अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचेही निदर्शनास आल्यानंतर, आता दुसºया बाजूला शहरात निर्माण होणाºया हजारो मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी, डम्पिंग ग्राउंडही अपुरे पडत असल्याचे विदारक चित्र आहे.
महापालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दरदिवशी ७ हजार ८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. मुंबईत देवनार आणि मुलुंड येथे दोन डम्पिंग ग्राउंड आहेत. कांजूर मार्ग येथे प्रक्रिया केंद्र आहे. दररोज देवनार डम्पिंग ग्राउंडवर ३ हजार मेट्रिक टन कचºयाचे डम्पिंग केले जाते. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर १ हजार ते १ हजार दोनशे मेट्रिक टन कचरा टाकला जातो. त्यामुळे उरलेल्या तीन ते चार हजार मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट कशी लावायची? हा प्रश्न महापालिकेसमोर आहे. कांजुरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर दोन ते तीन हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र, यासाठी कचºयाचे योग्य पद्धतीने वर्गीकरण होणे अत्यावश्यक आहे. गोराई येथील डम्पिंग ग्राउंड २००९ पासून बंद करण्यात आले आहे. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात कचºयाची विल्हेवाट लावण्याचा ताण देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर पडला आहे.
मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढेही लोकसंख्या वाढतच राहणार आहे. लोकसंख्येसोबत शहरातील कचºयाचे प्रमाणही वाढणार आहे.

कचºयाच्या डम्पिंग प्रक्रियेत पालिका भ्रष्टाचार करत आहे. महापालिकेकडून आजपर्यंत कधीच कोणत्याही वॉर्डमध्ये किती कचºयाची निर्मिती होते, किती कचºयाचे डम्पिंग होते, किती कचºयावर प्रक्रिया होते? याबाबत माहिती दिली जात नाही. महापालिकेने कचºयाचे आॅडिट लोकांना द्यावे. कचºयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येत असल्यामुळे, पालिका कचरा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत नाही. तिवरांच्या जागा नष्ट करून, त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड तयार करण्याचा घाट पालिकेकडून घातला जात आहे. नंतर त्या जमिनी विकासकांच्या घशात घातल्या जातात. मालाड येथील चिंचोली बंदर डम्पिंग ग्राउंड आणि गोराई डम्पिंग ग्राउंडचे जे झाले, त्याची पुनरावृत्ती ऐरोली येथे केली जाणार आहे.
- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

च्२ आॅक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण व व्यावसायिक आस्थापनांचा कचरा उचलला जाणार नाही. हे यापूर्वीच महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी अनेक ठिकाणी कचºयाची विल्हेवाट कशी लावावी, याबाबतच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आता सर्व विभागात मार्गदर्शनासाठी ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्याचे निर्देश, महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. शिवाय प्रत्येक विभागात टीम तयार करून, त्यांनी अशा सोसायट्यांना भेटी द्याव्यात व आवश्यक मार्गदर्शन करावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी ९ हजार ५०० मेट्रिक टन असलेला कचरा सुमारे ७ हजार ३०० टन एवढा खाली आणण्यात यश आले आहे, असा दावा महापालिकेने केला आहे. आॅक्टोबर २०१७ पर्यंत ६ हजार ५०० टन इतका खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

सध्या मुंबईत ५ हजार ३०४ अशा सोसायट्या असून, आतापर्यंत २३४ सोसायट्यांनी त्यांच्या पातळीवर प्रक्रिया करून, कचºयाची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण होणारा कचरा त्याच भागात प्रक्रिया करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले़
 

Web Title:  Waste of the trash, dumping too insufficient, future problems will be more serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.