कचऱ्यापासून वीजनिर्मितीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:32 AM2018-03-19T02:32:00+5:302018-03-19T02:32:00+5:30

दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याचा फटका महापालिकेच्या कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला बसला होता. त्यामुळे प्रक्रिया करण्यात येणा-या कच-याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.

The waste from the waste finally got 'Muhurat' | कचऱ्यापासून वीजनिर्मितीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला

कचऱ्यापासून वीजनिर्मितीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला

googlenewsNext

मुंबई : दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे येत नसल्याचा फटका महापालिकेच्या कच-यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला बसला होता. त्यामुळे प्रक्रिया करण्यात येणा-या कच-याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. परिणामी इच्छुक कंपन्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे या वर्षी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर मुहूर्त सापडला आहे.
कचºयापासून वीजनिर्मिती करण्याचे महापालिकेचे सर्वात मोठे स्वप्न. त्यानुसार देवनार कचराभूमीवर दररोज तीन हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून २५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा चंग पालिकेने बांधला होता. मात्र, बºयाच प्रयत्नांनंतरही या प्रकल्पासाठी कंपन्या पुढे आल्या नाहीत. यामुळे हा प्रकल्प बराच काळ रखडला. अखेर मुंबई महापालिकेने दररोज ६०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करून १० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा निर्धार केला आहे.
हा प्रयोग यशस्वी ठरल्यास कचºयापासून वीजनिर्मितीचे आणखी दोन प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पातील संभाव्य धोका आणि कचºयाचे प्रमाण अधिक असल्याने कंपन्या पुढाकार घेत नव्हत्या. मात्र, प्रक्रिया करण्यात येणाºया कचºयाचे प्रमाण आता कमी करण्यात आल्याने अनेक कंपन्यांकडून प्रतिसाद येत आहेत.
या प्रकल्पाच्या निविदापूर्व बैठकीत १६ कंपन्यांनी सहभाग घेतला होता, असे एका अधिकाºयाने सांगितले.
>केंद्राकडून अर्थसाहाय्य
केंद्र सरकारने पालिकेच्या कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला आर्थिक साहाय्य जाहीर केले आहे. त्यानुसार, देवनार कचराभूमीवरील दोन प्रकल्पांसाठी ५७१ कोटी रुपयांची मदत पालिकेला मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या डिझाइनपासून ते बांधणे, चालविणे आणि त्यांची देखभाल या तत्त्वावर वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम देण्यात येणार आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने मंजूर केलेल्या सहापैकी एका तंत्रज्ञानावर या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.
केंद्राच्या पर्यावरण, वन मंत्रालय तसेच नगरविकास मंत्रालयातून या प्रकल्पाला तांत्रिक सहकार्य मिळणार आहे.

Web Title: The waste from the waste finally got 'Muhurat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.