‘वायू’ वादळामुळे मुंबई किनारपट्टीवर कचराच कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:13 AM2019-06-17T02:13:14+5:302019-06-17T02:13:31+5:30
सर्वत्र अस्वच्छता; थर्माकॉल, बाटल्यांचा खच
मुंबई : गुजरातमध्ये धडकलेल्या ‘वायू’ चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांनाही बसला आहे. रविवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर कचºयाचे साम्राज्य पसरले होते. वायू चक्रीवादळामुळे समुद्राच्या आतील सर्व कचरा किनाºयावर येऊन जमा झाला होता. त्यामुळे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, आक्सा बीच आणि गोराई बीचच्या किनाºयावर कचरा साचलेला आढळून आला.
मरिन लाइफ आॅफ मुंबईचे समुद्री जीव अभ्यास प्रदीप पाताडे यांनी यासंदर्भात सांगितले की, महाराष्ट्र चक्रीवादळापासून सुरक्षित आहे. इतर राज्यांमध्ये जी चक्रीवादळ येतात याचा थोडासा परिणाम महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दिसून येतो. चक्रीवादळे ही आपल्या राज्यावर थेट धडकत नाही. वायू चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर कचरा जमा झाला असून तेलाचा थर असलेले थर्माकोल, रबरी स्लीपर, प्लॅस्टिक बॉटल्स इत्यादी कचरा हा किनारपट्टीवर दिसून येतो.
समुद्र लाटांची उंचीही वाढलेली आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जो पाऊस पडतोय तो कदाचित वायु चक्रीवादळामुळेही पडत असावा. परंतु मच्छीमारांच्या जाळ््यामध्ये कमी प्रमाणात कचरा अडकत आहे. म्हणजेच समुद्राच्या आतील सर्व कचरा हा आता किनारपट्टीवर येऊन जमा होतोय. पावसाळ््याच्या आधी जी हवा समुद्राकडून किनाºयाकडे येते. त्या हवेमार्फत समुद्राच्या खोलात असलेला कचरा किनारपट्टीवर आला असावा, असे यातून सिध्द होतो, असे भाष्य प्रदीप पाताडे यांनी केले.
वायू चक्रीवादळामुळे समुद्र किनाºयावर कडक पहारा
गिरगाव चौपाटीवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलिसांचा आणि जीवरक्षकांचा पहारा आहे. नागरिकांना समुद्रात जाऊ दिले जात नाही. किनाºयालगत असलेल्या वीजेच्या खांबांना दोºया बांधण्यात आल्या आहेत. बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. पर्यटकांना बीचवर फिरण्याची परवानगी आहे.