रिक्षाचालकांवर स्मार्ट कार्डद्वारे वॉच!
By admin | Published: September 4, 2014 02:22 AM2014-09-04T02:22:56+5:302014-09-04T02:22:56+5:30
रिक्षांतून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता ठाण्यातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्याचा निर्णय ठाणो वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
Next
ठाणो : स्वप्नाली लाड प्रकरणापासून धडा घेऊन रिक्षांतून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता ठाण्यातील रिक्षांमध्ये स्मार्ट कार्ड बसविण्याचा निर्णय ठाणो वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.
या स्मार्ट कार्डवर वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात येत असून त्यावर संपर्क साधताच महिलांसह अन्य प्रवाशांना तत्काळ मदत मिळू शकेल. एका खाजगी कंपनीमार्फत हे कार्ड तयार करण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक रिक्षाचालकास 1क्क् रुपये खर्च येणार आहे. यात रिक्षाचालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, रिक्षाचा क्रमांक, वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले असून, ते साधारण ओळखपत्रपेक्षा आकाराने मोठे असेल. त्यात दिलेल्या सुरक्षा कोडद्वारे चालकाची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळेल. प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी ते बसविले जाणार आहे. यासाठी रिक्षाचालकांची माहिती एका अर्जाद्वारे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, येत्या 15 तारखेला ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ठाण्याबरोबरच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी शहरात ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणो वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. अधिकृत रिक्षांमध्येच हे स्मार्ट ओळखपत्र बसविले जाणार असल्याने अनधिकृत रिक्षा शोधणोही सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)
या कार्डमध्ये सुरक्षा कोड देण्यात येणार असून, मोबाइलमध्ये प्रवाशांनी सेफ जर्नी नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे. त्याआधारे हा सुरक्षा कोड स्कॅन करताच काही क्षणांतच त्यांना रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. प्रत्येक रिक्षात चालकाच्या आसनामागे स्मार्ट कार्ड छापील स्वरूपात असणार आहे. त्यावर मोबाइल धरताच हा सुरक्षा कोड स्कॅन होईल. त्याचे छायाचित्रही प्रवाशांना काढता येणार आहे.