टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर पाहा मोफत, केबलवाल्यांनी आणली नवी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:52 AM2021-08-16T05:52:12+5:302021-08-16T05:53:49+5:30

Watch TV programs on mobile for free : फायबर आणि ओटीटीच्या ग्राहकांना पुन्हा आपल्या कक्षेत आणण्यासाठी केबल व्यावसायिकांनी स्वतःची प्रक्षेपण यंत्रणा विकसित केली आहे.

Watch TV programs on mobile for free, new system brought by cable operators | टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर पाहा मोफत, केबलवाल्यांनी आणली नवी यंत्रणा

टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर पाहा मोफत, केबलवाल्यांनी आणली नवी यंत्रणा

googlenewsNext

- सुहास शेलार

मुंबई : डिश टीव्ही, फायबर आणि ओटीटीचे प्रस्थ वाढू लागल्यामुळे, केबल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोरोनाच्या काळात जवळपास ४० टक्क्यांहून अधिक ग्राहक दुरावल्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केबलवाल्यांनी नवी यंत्रणा विकसित केली आहे. त्यासाठीच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केबल ग्राहकांना टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना पाहता येणार आहेत.

फायबर आणि ओटीटीच्या ग्राहकांना पुन्हा आपल्या कक्षेत आणण्यासाठी केबल व्यावसायिकांनी स्वतःची प्रक्षेपण यंत्रणा विकसित केली आहे. ‘एओएसपी’ आणि ‘एटीव्ही’ मान्यताप्राप्त असलेली ही यंत्रणा एकाच पॅकेजमध्ये टीव्ही, इंटरनेट, ओटीटी आणि क्रोम कनेक्ट सुविधा देईल.

क्रोम कनेक्टद्वारे अतिरिक्त शुल्काशिवाय टीव्हीवरचे कार्यक्रम मोबाइलवर आणि घरात दुसरा स्मार्ट टीव्ही असल्यास, त्यावरही पाहता येतील, शिवाय मल्टिप्लेक्ससोबत करार केल्याने, शुक्रवारी प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट घरबसल्या पाहता येतील. त्यासाठी मात्र शुल्क आकारले जाईल. ‘४ के’ बॉक्समुळे विनाअडथळा टीव्ही, इंटरनेट आणि अन्य सेवांचा वापर करता येईल, अशी माहिती शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी दिली.

एका बॉक्समध्ये या सुविधा मिळणार...
टीव्ही चॅनल्स, इंटरनेट, ओटीटी, क्रोम कनेक्टद्वारे मोबाइल आणि दुसऱ्या टीव्हीलाही जोडणी, फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता येणार,  जगातील आघाडीचे शैक्षणिक चॅनल दिसणार

१०,५००रुपये 
वार्षिक शुल्क 

  छुपी वसुली
- आघाडीच्या कंपन्या ग्राहकांकडून बरेच छुपे शुल्क वसूल करतात. इंटरनेटच्या स्पीडबाबत सर्वाधिक तक्रार असते, अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 
- कोणतेही हिडन चार्जेस नाहीत, पॅकेजमध्ये नमूद केल्यानुसार सर्व डेटा ग्राहकांना वापरता येईल. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. 
- राज्यातील केबलचालकांना या तंत्रज्ञानाशी जोडून देशभरात या यंत्रणेचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Watch TV programs on mobile for free, new system brought by cable operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.