वसई-विरारकरांवर ‘पाणी’बाणी

By admin | Published: July 11, 2015 11:15 PM2015-07-11T23:15:50+5:302015-07-11T23:15:50+5:30

पाऊस लांबल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी पुन्हा खोलवर गेली असून काही दिवसांपासून उपप्रदेशामध्ये तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे.

'Water' bani on Vasai-Virarkar | वसई-विरारकरांवर ‘पाणी’बाणी

वसई-विरारकरांवर ‘पाणी’बाणी

Next

वसई : पाऊस लांबल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी पुन्हा खोलवर गेली असून काही दिवसांपासून उपप्रदेशामध्ये तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या ३ धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी असून पाण्याचे नियोजन करून त्याचे वितरण करण्यावर महानगरपालिका प्रशासनाने भर दिला आहे. पाणी कसे वाचवायचे, यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून याबाबत नागरिकांनाही आवाहन करण्यात येणार आहे दरवर्षी सर्वसाधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस वसई-विरार उपप्रदेशात पाणीटंचाईला सुरुवात होते. यंदा मे च्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्यामुळे उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या ३ धरणांतील पाण्याच्या साठ्यांत वाढ झाली होती. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. परंतु, त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. येत्या आठवडाभरात पाऊस न पडल्यास नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) ६९ पाणीपुरवठा योजना रखडल्या सूर्याचा अतिरिक्त टप्पा व देहर्जे पाणीपुरवठा येत्या ३ महिन्यांत मार्गी लागण्याची शक्यता आहे. परंतु, पावसाने रुसवा सोडला नाहीतर मात्र वसई-विरारकरांच्या तोंडचे पाणी पळणार आहे. ग्रामीण भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे कामही रखडले आहे. सन २००५ मध्ये वसई-विरार उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा-२ ला मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी सुमारे ८५ कोटी १६ लाख २२ हजार रुपयांचा आर्थिक निधी राज्य शासन तर १० टक्के लोकवर्गणी असे निकष ठरविण्यात आले होते. परंतु, लोकवर्गणीला स्थानिकांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे ही लोकवर्गणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरावी, अशा प्रकारचा निर्णय झाला होता. त्यानुसार, २७ पॉइंट्स नक्की करण्यात आले. त्यापैकी १९ पॉइंट्स महानगरपालिकेने दिले, तर उर्वरित ८ पॉइंट्स मात्र पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे महानगरपालिकेने देण्यास नकार दिला होता.

Web Title: 'Water' bani on Vasai-Virarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.