मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 18:16 IST2020-12-14T18:16:33+5:302020-12-14T18:16:44+5:30
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही; मुंबई महापालिकेचा अहवाल
मुंबई: मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिलस्थित 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा'या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.