न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट!

By मनोहर कुंभेजकर | Published: May 22, 2023 06:28 PM2023-05-22T18:28:48+5:302023-05-22T18:29:14+5:30

म्हाडा पंपहाऊसजवळ आउटलेट व इनलेटमध्ये लिकेज असल्याने मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा खंडीत

Water boiling in New Dindoshi Mhada Colony! | न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट!

न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत पाण्याचा ठणठणाट!

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत सुमारे 16 टक्के पाणी साठा असतांना न्यू दिंडोशी  म्हाडा वसाहतीत मात्र आज पाण्याचा ठणठणाट आहे.येथील सामना परिवार जवळील म्हाडा पंप हाऊस जवळ आउटलेट व इनलेट मध्ये लिकेज आढल्याने येथील पाणी पुरवठा आज मध्यरात्री पासून खंडीत करण्यात आला.

आज दिवसभर घरात पाणी आले नसल्याने  येथील नागरिकांचे व महिला वर्गाचे तर खूप हाल झाले.येथील नागरिकांच्या घरात पाण्या अभावी अंघोळी नाही,तर चूल पेटली नसल्याने बाहेरून जेवण मागवावे लागले.तर अनेकांनी ब्लिसलरी पाण्याचे कॅन घरी मागवून आजचा दिवस घालवला.तर येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी सुमारे 4000 ते 4300 रुपये प्रति ट्रॅकर असे किमान 6 ते 8 ट्रॅकर पाणी सदस्यांना विरतीत करण्यासाठी सोसायटीत मागवले असल्याची माहिती गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतला दिली.

दरम्यान न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या पाणी टंचाई बाबत सदर प्रतिनिधीने  पी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांनी चांगले सहकार्य केले.त्यांनी लगेच पाणी खात्याचे सहाय्यक अभियंता राकेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि येथील पाणी टंचाई बद्धल विचारणा केली.शिंदे आणि साईट वर असलेले दुय्यम अभियंता प्रसाद देशमुख यांच्याशी चर्चा केली असता, सध्याचे असलेले कडक ऊन आणि जुन्या झालेल्या जलवाहिन्या यामुळे गेल्या शनिवारी रात्री आउटलेट मध्ये लिकेज असल्याचे लक्षात आले.काल पासून काम करण्यास सुरुवात केली. आज दुपारी काम पूर्ण होत आले असतांना इनलेट मध्ये पण लिकेज असल्याचे आढळले.काम युद्ध पातळीवर सुरू असून आज रात्री 8.30 पर्यंत काम पूर्ण झाल्यावर न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीचा पाणी पुरवठा मध्यरात्री सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

Web Title: Water boiling in New Dindoshi Mhada Colony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.