दक्षिण मुंबईवर ‘पाणीसंकट’

By Admin | Published: November 3, 2014 01:24 AM2014-11-03T01:24:09+5:302014-11-03T01:24:09+5:30

दक्षिण मुंबईतील काही विभागांना बसल्यामुळे रविवारी या विभागातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. ऐन सुटीच्या दिवशी पाणी भरण्यासाठी स्थानिकांचे अतोनात हाल झाले.

'Water clash' on south Mumbai | दक्षिण मुंबईवर ‘पाणीसंकट’

दक्षिण मुंबईवर ‘पाणीसंकट’

googlenewsNext

मुंबई : दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरात शनिवारी जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली. याचा फटका दक्षिण मुंबईतील काही विभागांना बसल्यामुळे रविवारी या विभागातील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. ऐन सुटीच्या दिवशी पाणी भरण्यासाठी स्थानिकांचे अतोनात हाल झाले.
रे रोड येथे ५७ इंचाची जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला. त्यानंतर, त्वरित पालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. ही जलवाहिनी फुटल्यामुळे कुलाबा, काळबादेवी, जे. जे. रुग्णालय, परळ, भायखळा, माझगाव, घोडपदेव या परिसरातील नागरिकांवर पाणीसंकट ओढावले. दक्षिण मुंबईतील नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून बोअरिंग, टँकरसाठी लांबच्या लांब रांगा लावाव्या लागल्या. ऐन सुट्टीच्या दिवशी पाण्याचा बोजवारा उडाल्यामुळे दक्षिण मुंबईकर हैराण झाले. पाणीकपातीची वार्ता पसरल्यामुळे या विभागातील स्थानिकांची पाणी काटकसर करून वापरण्यासाठी काहीशी धावपळ उडाली. शिवाय, लोकप्रतिनिधींनीही स्थानिकांच्या या समस्येकडे कानाडोळा केल्यामुळे दक्षिण मुंबईकरांचा रविवार पाण्यात गेला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Water clash' on south Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.