नवेनगर परिसरात चार दिवस पाणी बंद
By admin | Published: February 25, 2015 10:26 PM2015-02-25T22:26:23+5:302015-02-25T22:26:23+5:30
महाड शहराच्या पूर्वेकडील वसाहतीचा परिसर म्हणजे नवेनगर, पंचशील नगर, सुतार आळी, स्रेहा सोसायटी, शेडगे आवाड, महामार्ग वसाहत, शेडाव नाका याठिकाणी काही
महाड : महाड शहराच्या पूर्वेकडील वसाहतीचा परिसर म्हणजे नवेनगर, पंचशील नगर, सुतार आळी, स्रेहा सोसायटी, शेडगे आवाड, महामार्ग वसाहत, शेडाव नाका याठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे पुढील चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे आज महाड नगर पालिकेतर्फे जाहीर करण्यात आले.
एमआयडीसीकडून वरील परिसराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु पाण्याच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने व ती दुरुस्त होण्यास चार दिवसांचा काळ जाणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने दोन टँकरची व्यवस्था केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सकपाळ यांनी केले आहे.
महाड शहराला कुर्ले, कोतुर्डे येथील धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे शहराच्या पूर्वेकडील वसाहतीला एमआयडीसी कडून पाणीपुरवठा करण्यात येतो. दररोज सुमारे १२ लाख लीटर पाणी एमआयडीसीकडून घेतले जाते. गेल्या दोन दिवसांपासून नवेनगर, सुतार आळी, पंचशीलनगर, स्रेहा सोसायटी, शेडाव नाका इत्यादी परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य झाले असल्याचे सांगण्यात आले. या पंपाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी पाणीपुरवठा नियमित होण्याकरिता चार दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.
बुधवारी नगराध्यक्षा भारती सकपाळ यांच्या दालनामध्ये घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकींमध्ये नवेनगरसह अन्य परिसरांमध्ये टँकरने पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.